उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!
उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता.२७) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
........
मध्य रेल्वे -
कुठे - माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम - या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत; तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप-जलद सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप-धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील.
...........
हार्बर रेल्वे
कुठे- चुनभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी- सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील; तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएमएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
............
पश्चिम रेल्वे-
कुठे- चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप धिम्या आणि डाऊन जलद मार्गावर
कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम- या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहेत.