श्रद्धा हत्याकांडात आज दोघांचे जबाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रद्धा हत्याकांडात आज दोघांचे जबाब
श्रद्धा हत्याकांडात आज दोघांचे जबाब

श्रद्धा हत्याकांडात आज दोघांचे जबाब

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : श्रद्धा हत्याकांडात दिल्ली पोलिसांचे एक पथक मागील आठ दिवसांपासून वसईत तळ ठोकून आहे. आज (ता. २५) दोन जणांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. आजपर्यंत दिल्ली पोलिसांनी २० जणांचे जबाब नोंदवले असून हे सर्व कॉलेज मित्र, तिला मदत करणारे संपर्कातील लोक आहेत. हत्याकांडातील काही महत्त्वाचे धागेदोरे दिल्ली परिसरातील तपासात बाहेर निघत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

श्रद्धाचा महाविद्यालयीन मित्र आणि श्रद्धा-आफताब दिल्लीला रेल्वेने जात असताना भेटलेल्या एका व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला. रजत शुक्ला हा तिचा कॉलेज मित्र; तर विक्रमसिंग होशयरसिंग लबाना हा दोघेही दिल्लीला रेल्वेने जात असताना एकाच डब्यात असताना त्यांची ओळख झाल्याचा दावा करत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचाही जबाब नोंदवला आहे. या जबाबात फक्त ते कसे ओळखत होते, किती दिवस संपर्क होता, याविषयी मत नोंदवण्यात आले आहे.

शोधमोहीम थंडावली
भार्इंदर खाडीमध्ये आफताबने हत्येतील महत्त्वाचा पुरावा समजला जाणारा मोबाईल फेकला, असे सांगण्यात येते. या प्रकरणी काल (ता. २४) खाडीमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली आहे. त्यानंतर आजही (ता. २५) शोधमोहीम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांनी आज खाडीमध्ये कोणतीही शोधमोहीम राबवली नाही.