मंगळवार-बुधवारी मुंबईत पाणीबाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवार-बुधवारी मुंबईत पाणीबाणी
मंगळवार-बुधवारी मुंबईत पाणीबाणी

मंगळवार-बुधवारी मुंबईत पाणीबाणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलिमीटर वाहिनीवरील ३०० मिलिमीटर बायपास जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळी ८.३० पासून बुधवारी (ता. ३०) सकाळी ८.३० पर्यंत हे दुरुस्ती काम केले जाणार आहे. या कालावधीत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच के/पश्चिम परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.