५८ लाखांच्या ५५०० ई-सिगारेट जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५८ लाखांच्या ५५०० ई-सिगारेट जप्त
५८ लाखांच्या ५५०० ई-सिगारेट जप्त

५८ लाखांच्या ५५०० ई-सिगारेट जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ५८ लाख ५० हजार रुपयांचे ५५०० ई-सिगारेट जप्त करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सीबी कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने ही कारवाई केली. सातरस्ता, आग्रीपाडा परिसरात एक जणाने मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट विक्रीसाठी मागवल्याची माहिती सूत्रांकडून सी. बी. कंट्रोल कक्षास प्राप्त झाली होती. या माहितीनुसार पोलिस पथकाने सापळा रचून बापूराव जगताप मार्ग, सातरस्ता, आग्रीपाडा येथे ई-सिगारेटचा साठा डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या टेम्पोची झडती घेत माल ताब्यात घेतला.