नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा
नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा

नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा

sakal_logo
By

कल्याण, ता. २८ (बातमीदार) ः भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय नौदलाच्या भारत का गर्व या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी थिंक राष्ट्रीय प्रश्नोत्तरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण येथील भाल गुरुकुल इंग्लिश मीडियम शाळेतील स्नेहा झा आणि अनन्या मुंडे या दोन विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत दुसरा क्रमांक पटकावत शाळेसह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील ७५०० शाळांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत यश मिळवत देशभरातील १६ शाळा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्या. यामध्ये कल्याण येथील भाल गुरुकुल इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थिनींची निवड झाली होती. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी दोन्ही विद्यार्थिनींना सहा दिवसांसाठी आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर राहण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाची ओळख व्हावी आणि त्यांनाही थेट देशसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर आयोजित करण्यात आली होती.