Thur, Feb 2, 2023

उमेदवारी अर्ज भरणे सुरू
उमेदवारी अर्ज भरणे सुरू
Published on : 28 November 2022, 11:10 am
पालघर, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. यात पालघर ३२, वाडा १५, वसई १५ आणि तलासरी एक याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या नामनिर्देशन पत्राची छाननी पाच डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे. तर नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी अखेरची तारीख ७ डिसेंबर असून त्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून उमेदवाराला निवडणूक चिन्ह चे वाटप केले जाईल. तर २० डिसेंबर रोजी तहसील कार्यालय या अन्य ठिकाणी मतमोजणी होणार आहे.