Thur, Feb 9, 2023

जिल्हा परिषद अध्यक्षांची विविध शाळांना भेट
जिल्हा परिषद अध्यक्षांची विविध शाळांना भेट
Published on : 28 November 2022, 11:53 am
पालघर, ता. २८ (बातमीदार) : जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना भेटी देत त्यांनी विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन तपासले. पालघर जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे निकम यांनी सांगितले. त्या अनुषंगाने पालघर तालुक्यापासून त्यांनी सुरुवात केली असून पालघर तालुक्यातील विविध शाळांमध्ये भेटी देत त्यांनी शाळा, परिसर येथील स्वच्छतेची पाहणी करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचीसुद्धा तपासणी केली.