बोडारे बंधूंना शंकराचार्य यांच्या हस्ते जीवनगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोडारे बंधूंना शंकराचार्य यांच्या हस्ते जीवनगौरव
बोडारे बंधूंना शंकराचार्य यांच्या हस्ते जीवनगौरव

बोडारे बंधूंना शंकराचार्य यांच्या हस्ते जीवनगौरव

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) ः उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विराट संत मेळाव्यात शंकराचार्य यांच्या हस्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आणि जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कॅम्प नंबर चारमधील स्वामी देवप्रकाश हॉलमध्ये विश्वशांती, विश्वकल्याण, आरोग्य मार्गदर्शन, पर्यावरण शुद्धीसाठी आंतरराष्ट्रीय विराट संत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काशी धर्मपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांना सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख विजय पवार, हर्षवर्धन पालांडे, कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख शरद पाटील, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक अंजली राऊत, माजी शहरप्रमुख बाळा राऊत, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दत्तात्रय कदम, माजी नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.