रस्त्यावरील विक्रेत्‍यांना जिल्‍हा परिषदेची छत्रछाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील विक्रेत्‍यांना जिल्‍हा परिषदेची छत्रछाया
रस्त्यावरील विक्रेत्‍यांना जिल्‍हा परिषदेची छत्रछाया

रस्त्यावरील विक्रेत्‍यांना जिल्‍हा परिषदेची छत्रछाया

sakal_logo
By

खर्डी, ता. २८ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हे शेतात पिकवलेला शेतमाल, भाजीपाला व फळे बाजारपेठेच्या ठिकाणी रस्त्यावर विक्री करत असतात. या गैरसोयीची दखल घेत जिल्‍हा परिषद कृषी सभापती संजय निमसे यांनी सेस फंडातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत जवळपास दीडशे भाजीपाला विक्रेत्यांना छत्री, प्‍लास्टिक क्रेटस, इलेक्ट्रिक वजन काटा, लोखंडी स्टॅन्ड हे व्यवसाय उपयोगी किट ९० टक्‍के शासकीय अनुदानातून वाटप करण्यात येत आहे. या किटमध्ये असलेल्या जम्बो छत्रीमुळे ऊन, वारा, पाऊस यापासून भाजीपाला विक्रेत्यांचे संरक्षण होणार असून, त्यामुळे जिल्हा परिषदेकडील योजनेची छत्रछाया गोरगरीब व्यावसायिकांना बहुमोल ठरणार आहे. या योजनेचा शुभारंभ शहापूर पंचायत समितीमध्ये कृषी सभापती संजय निमसे, पंचायत समिती सभापती यशोदा आवटे, उपसभापती कविता भोईर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना किटचे वाटप करून करण्यात आला. शहापूर तालुक्यातील शिरोळ फाटा येथील गणेश कालचीडा, शहापुरातील देवीचे मंदिर येथे उघड्यावर भाजी विकणाऱ्या संगीता भांडे व आसनगाव स्टेशनवरील विनोद बांगर यांना यावेळी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी बी.एस. राठोड, रवींद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी विलास घुले, विलास झुंजारराव, सचिन गंगावणे, ललित बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.