राज्य पुरस्कार प्राप्त गुरुनाथ पष्टे यांचा सेवापूर्ती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य पुरस्कार प्राप्त गुरुनाथ पष्टे यांचा सेवापूर्ती सोहळा
राज्य पुरस्कार प्राप्त गुरुनाथ पष्टे यांचा सेवापूर्ती सोहळा

राज्य पुरस्कार प्राप्त गुरुनाथ पष्टे यांचा सेवापूर्ती सोहळा

sakal_logo
By

वाडा, ता. २८ (बातमीदार) : घोणसई केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुनाथ पष्टे यांचा सेवापूर्ती सोहळा केंद्र शाळा घोणसई येथे आयोजित करण्यात आला होता. पष्टे यांच्या अभ्यासक्रमाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग तालुक्यातील शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण घेऊन अध्यापनात शिक्षकांनी केला. पष्टे यांनी अनेक शैक्षणिक समस्यांवर मात करून उद्योगपती व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने तालुक्यातील शाळांना संगणक, प्रोजेक्ट अशी डिजिटल साधने उपलब्ध करून दिली. शाळातून संगणकीय शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याने शाळांमध्ये शैक्षणिक कार्य उत्तम प्रकारे होऊ लागल्याच्या प्रतिक्रिया पष्टे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त शिक्षकांनी व्यक्त केल्या.
पष्टे यांच्या शैक्षणिक प्रयोगांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने पष्टे यांचा आदर्श केंद्र प्रमुख राज्य पुरस्कार देऊन गौरव केला. सेवा पूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त केंद्र प्रमुख अशोक पाटील यांनी भूषवले. जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, व्ही. टी. पाटील, किशोर चौधरी व केंद्रातील शिक्षकांनी आपल्या वक्तव्यातून पष्टे यांच्या कामाचा गौरव केला. कार्यक्रमात सरपंच शैला जाबर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, रूपेश घरत, दशरथ पाटील, उचाट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उमा पटेल, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उदय पाटील, मोहन पाटील, रतीश भोईर व शाळेतील शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन रश्मी भोईर आणि अपूर्वा सावंत यांनी केले. उपस्थितांचे आभार मोहन पाटील यांनी मानले.