कुलाब्यात काव्य सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलाब्यात काव्य सोहळा
कुलाब्यात काव्य सोहळा

कुलाब्यात काव्य सोहळा

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २८ (बातमीदार) ः कोकण मराठी साहित्य परिषद गिरगाव शाखा आणि कला मंच दिवाळी अंक यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा येथे पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आणि काव्यसंध्या आयोजित करण्यात आली होती. यात जयश्री संगीतराव लिखित ‘झाले मोकळे आकाश’ या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन भरारी प्रकाशनच्या वतीने करण्यात आले. तसेच हेमांगी नेरकर यांच्या ‘प्रारब्ध’ या काव्यसंग्रहाचे व कला मंच दिवाळी अंकाचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोमसापच्या विश्वस्त रेखा नार्वेकर आणि कोमसाप मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष लता गुठे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कवयित्री गौरी कुलकर्णी, मेघना साने, ज्योती कपिले, हेमांगी नेरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले.