Mon, Jan 30, 2023

रक्तदान शिबिरात १०० नागरिकांचा सहभाग
रक्तदान शिबिरात १०० नागरिकांचा सहभाग
Published on : 28 November 2022, 12:33 pm
मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः कोरोना संकटामुळे हॉस्पिटल, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. अशा वेळी लोअर परळ येथील न्यू शिवाजी क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सेव्हन हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने मंडळाचे संस्थापक वसंत खानोलकर तथा शरद खानोलकर यांच्या स्मृतिनिमित्त रविवारी (ता. २७) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी आमदार सुनील शिंदे, मनसेचे विभाग सचिव उत्तम सांडव, वरळी युवासेना विभागप्रमुख संकेत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये १०५ नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केले.