Wed, Feb 1, 2023

राजाराम शेठ विद्यालयामध्ये संविधान दिन
राजाराम शेठ विद्यालयामध्ये संविधान दिन
Published on : 28 November 2022, 12:33 pm
मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल खिंडीपाडा येथे संविधान दिन पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर यांनी मुलांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय तसेच संविधानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कुमारी एकता माने व जानवी सनगले यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.