Sat, Feb 4, 2023

पेणमध्ये मनसे ताकदीने लढवणार
पेणमध्ये मनसे ताकदीने लढवणार
Published on : 28 November 2022, 7:42 am
पेण, ता. २८ (वार्ताहर) : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मनसे पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे तालुकाध्यक्ष रूपेश पाटील यांनी झालेल्या बैठकीत सांगितले. पेण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भात नुकतीच मनसेची पेणगड कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत अनेक तरुणांनी मनसेला अधिक उभारणी देण्याचे ठरवले असल्याने जो उमेदवार मनसेचा असेल, त्याच्यामागे संपूर्ण ताकद लावण्यात येणार आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांची यादी तयार झाली असून, येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.