संघर्ष अकादमीचे पाच विद्यार्थी अग्निवीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्ष अकादमीचे पाच विद्यार्थी अग्निवीर
संघर्ष अकादमीचे पाच विद्यार्थी अग्निवीर

संघर्ष अकादमीचे पाच विद्यार्थी अग्निवीर

sakal_logo
By

किन्हवली, ता. २८ (बातमीदार) : किन्हवली येथील पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संघर्ष अकादमीचे पाच विद्यार्थी अग्निवीर व एक विद्यार्थी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अंतिम चाचणीत पात्र ठरले आहेत. अनेक वर्षांपासून पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुनील केदार यांच्या संघर्ष अकादमीचे हर्षल यशवंतराव, अजय मुरबाडे, सुमित जोशी, अजित गवाळे, अभय ठाकरे हे पाच विद्यार्थी अग्निवीर व अजय भोईर हा विद्यार्थी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अंतिम चाचणीत पात्र ठरले आहेत.
या दोन्ही भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाते. त्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा–सीईई) झाल्यावर शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षा द्यावी लागते. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना ‘अग्निवीर’ म्हणून भारतीय लष्करात भरती होण्याबाबतचे पत्र देण्यात येणार आहे.