Sun, Jan 29, 2023

एपीएमसीत द्राक्षांचे उशिरा आगमन
एपीएमसीत द्राक्षांचे उशिरा आगमन
Published on : 28 November 2022, 12:48 pm
वाशी, ता. २८ (बातमीदार)ः वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत द्राक्षांची तुरळक आवक सुरू झाली आहे, पण पाऊस लांबल्याने यंदा द्राक्षाच्या आगमनाला उशीर झाला असून चवदेखील आंबट आहे. एपीएमसी बाजारात दोन दिवसांपासून द्राक्षांची तुरळक आवक सुरू झाली आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्राक्षाची आवक सुरू होते. तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षांची अधिक आवक सुरू होते; तर १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू असतो. अशातच आता बाजारात फक्त १ ते २ छोट्या गाड्या दाखल होत आहेत. तसेच दाखल होणारे द्राक्ष चवीला आंबट येत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ५ डिसेंबरनंतरच द्राक्षाची आवक वाढेल, असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे.