Mon, Feb 6, 2023

संत योगानंदचार्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दत्त जन्मोत्सव
संत योगानंदचार्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दत्त जन्मोत्सव
Published on : 28 November 2022, 11:06 am
बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : श्री संत योगानंदचार्य उर्फ रत्नाकर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, बदलापूर इंदगाव येथील मठात श्री दत्तजयंती सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त मठात नवनाथ भक्तीसार व गुरुचरित्र पारायण तसेच भव्य पालखी सोहळा होणार असून, ५ ते ७ डिसेंबर या तीन दिवसांत भजन, कीर्तन, पारायण, महाप्रसाद यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुरबाड विधानसभा क्षेत्रातील आमदार किसन कथोरे हे उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.