विक्रमगड येथे ‘भविष्यावर बोलू काही’ विषयावर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड येथे ‘भविष्यावर बोलू काही’ विषयावर व्याख्यान
विक्रमगड येथे ‘भविष्यावर बोलू काही’ विषयावर व्याख्यान

विक्रमगड येथे ‘भविष्यावर बोलू काही’ विषयावर व्याख्यान

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) : विक्रमगड हायस्कूल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून ‘भविष्यावर बोलू काही’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विक्रमगड हायस्कूल येथील विद्यार्थ्यांकरिता प्रख्यात वक्ते गणेश शिंदे यांचे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे, जिजाऊ महिला सक्षमीकरणाच्या हेमांगी पाटील, विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, पंचायत समिती उपसभापती विनोद भोईर, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, नगरसेवक निकेत पडवळे, अमोल भडांगे, नगरसेविका अर्चना लोहार, चंद्रशीला भडांगे, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था उपाध्यक्ष मनोज पाटील, जिजाऊ संस्थेचे दत्तात्रय भडांगे, सुजित भानुषाली, विक्रमगड हायस्कूलचे मुख्याध्यापक घोलप सर, पर्यवेक्षक पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, सुजय जाधव, वैभव महसने, रोहित यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिजाऊ संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, विक्रमगड हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.