Mon, Feb 6, 2023

‘लैंगिक छळप्रकरणी समिती स्थापन करा’
‘लैंगिक छळप्रकरणी समिती स्थापन करा’
Published on : 28 November 2022, 12:44 pm
मुंबई, ता. २८ : नाशिक येथील अनाथआश्रमाच्या संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित खात्याच्या प्रधान सचिवांना दिला आहे. यासंदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. लोढा यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली असून, सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यास सचिवांना सांगण्यात आले आहे. त्यावर सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले आहेत.