श्रद्धा वालकरच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रद्धा वालकरच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा
श्रद्धा वालकरच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

श्रद्धा वालकरच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

sakal_logo
By

खारघर, ता. २८ (बातमीदार) : वसई येथील श्रद्धा वालकर या युवतीची हत्या करणाऱ्‍या आफताब अमीन पूनावाला यास तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि पूनावाला कुटुंबियांचे भारतीय नागरिकत्व रद्द व्हावे आदी मागण्यांसाठी नागरिकांनी पनवेलमध्ये निषेध मोर्चा काढला. धर्मांतरविरोधी कायदा पारित व्हावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

पनवेल येथील एसटी स्टँडसमोरील विसावा हॉटेलपासून निघालेला निषेध मोर्चा बाजारपेठमार्गे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या प्रांगणात समाप्त झाला. सभेच्या सुरुवातीला भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला मंच अध्यक्षा बिना गोगरी यांनी या मोर्चाच्या आवश्यकतेबद्दल आपले विचार मांडले. त्यानंतर संत समाजाचे प्रतिनिधी म्हणून रायगड जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष पुंडलिक महाराज फडके यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अनिशा म्हात्रे हिनेही मनोगत व्यक्त केले. वंदे मातरम गीताने याचा समारोप झाला. या वेळी व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, विधिज्ञ यांची उपस्थिती होती.