प्रलंबित मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचे ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचे ठिय्या
प्रलंबित मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचे ठिय्या

प्रलंबित मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचे ठिय्या

sakal_logo
By

वाडा, ता. २८ (बातमीदार) : विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २८) आंदोलनाचा तिसरा दिवस होता. प्रशासन व आंदोलकांत यशस्वी चर्चा न झाल्याने आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.
या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव चंद्रकांत धांगडा, जिल्हा कमिटी सदस्य प्रकाश चौधरी करीत आहेत. वन जमीन कसणाऱ्यांच्या नावावर ताब्यातील संपूर्ण जमीन मोजून ती भोगवटादार सदरी कसणाऱ्याचे नाव लावण्यात यावे. अपात्र झालेले दावे कलम १३ नुसार आदिवासी व बिगरआदिवासी सर्व दावे मंजूर करा व राहिलेले उर्वरित दावे स्वीकारण्यात यावेत, भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्लॉटधारकांची झालेली चुकीची मागणी रद्द ठरवून पुन्हा नव्याने मोजणी करून गटबुक नकाशा द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, तालका कृषी कार्यालयाकडून खरीप हंगामासाठी कडधान्ये बी-बियाणे व औषधांचे वाटप करण्यात यावे, मुंबई-बडोदरा महामार्गाकरिता संपादित केलेल्या जागा मालकांना मोबदला बाकी आहे तो योग्य पद्धतीने देण्यात यावा, वाडा नगरपंचायत हद्दीत विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यात यावेत आदी मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.