निकिताज अबॅकस अकादमीच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकिताज अबॅकस अकादमीच्या विद्यार्थ्यांचे यश
निकिताज अबॅकस अकादमीच्या विद्यार्थ्यांचे यश

निकिताज अबॅकस अकादमीच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : जी-चॅम्प अबॅकस औरंगाबादद्वारा आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत बदलापूर, मुंबई व उपनगर परिसरातील निकिताज अबॅकस अकादमीमधील २५ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. शालेय जीवनात शिकत असताना बहुतांश मुलांना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित. त्यात हा विषय मुलांच्या आवडीचा विषय व्हावा, हा विषय शिकण्याची मुलांची इच्छा व्हावी यासाठी अबॅकस ही पद्धत भारतातसुद्धा आता प्रचलित होत आहे. याच अनुषंगाने जी-चॅम्प अबॅकस औरंगाबादच्या वतीने राज्यस्तरीय आयोजित या स्पर्धेत राज्यातून जवळपास २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी निकिताज अकादमीच्या २५ विद्यार्थ्यांनी १५ मिनिटांमध्ये १०० प्रश्न सोडवून घवघवीत यश संपादन केले आहे. अबॅकसमुळे गणिताची भीती नाहीशी होऊन मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते हे मुलांनी सिद्ध केले आहे, असे या वेळी नीकिताज अकादमीच्या संचालिका निकिता तांबे-गायकवाड यांनी सांगितले. या स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना समाजसेवक शांताराम वाळिंजकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी प्रोफेसर संध्या वैद्य, शिक्षक जयेंद्र कदम यांनी या मुलांना मार्गदर्शन केले.