रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखा
रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखा

रेल्वेवरील दगडफेकीच्या घटना रोखा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : काही दिवसांपासून लोकल तसेच मेल एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा. तसेच दिवा स्थानकात आरोग्य केंद्रासह बंद पडलेले वन रुपी क्लिनिक सुरू करण्यात यावे, अशी मागणी ठाणे रेल्वेस्थानक येथे झालेल्या रेल्वे सल्लागार कमिटी बैठकीत करण्यात आली.
मध्य रेल्वे मार्गावर लोकल तसेच मेल एक्सप्रेसवर दगडफेक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आरपीएफ, जीआरपी तात्काळ सदर घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन जनजागृती करत आहेत. तसेच दगडफेक करणाऱ्याचा शोधदेखील घेतला जात आहे. दगडफेकीचे प्रमाण वाढत असल्याने अशा घटनांमुळे प्रवासी जखमी होत आहेत. यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. दिवा रेल्वेस्थानक येथे आरोग्य केंद्र नसल्याने जखमी प्रवाशांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर दिवा स्थानक येथे आरोग्य केंद्र सुरू करावे आणि मुंब्रा, डोंबिवली रेल्वे स्थानकावर बंद असलेले वन रुपी क्लिनिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे या संदर्भात अमोल कदम यांनी मध्य रेल्वेचे डीसीएम दीपक शर्मा यांना निवेदन दिले. याप्रसंगी आरपीएफचे अधिकारी आर. एस. चौधरी, जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, स्टेशन मॅनेजर तसेच रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

..............................
कळवा स्थानकात थांबा द्यावा
कळवा, मुंब्रा रेल्वेस्थानक येथे जलद लोकलला थांबा देण्यात यावा. कळवा कारशेड लोकल सकाळच्या वेळेत कळवा रेल्वे स्थानकातून सुरू करावी, अशा समस्यांचे निवेदन सेन्ट्रल रेल्वे स्थानक सल्लागार कमिटी सदस्य अमोल कदम यांनी मध्य रेल्वेचे डीसीएम दीपक शर्मा यांना निवेदन दिले. या प्रसंगी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क करून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.