Tue, Jan 31, 2023

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन
ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन
Published on : 28 November 2022, 4:42 am
जुईनगर, ता. २८ (बातमीदार) : शहरामधील ज्येष्ठ विरंगुळा केंद्रातील संघाचा १४ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठांनी मराठी जुन्या गाण्यांवर नृत्य करून गाण्यांच्या भेंड्या खेळून आनंद साजरा केला. या वेळी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, अभिजित देसाई, अक्षय भोसले, तसेच इतर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांचा आनंद द्विगुणित केला.