अतिक्रमण करणाऱ्या विकसकावर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण करणाऱ्या विकसकावर कारवाईची मागणी
अतिक्रमण करणाऱ्या विकसकावर कारवाईची मागणी

अतिक्रमण करणाऱ्या विकसकावर कारवाईची मागणी

sakal_logo
By

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील कुरुंद येथे सरकारी जागेवर एका विकसकाने अतिक्रमण करून गोदाम बांधले आहे. ही गोदामे निष्काषित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कुरुंद ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप काठोले यांनी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे केली आहे.

भिवंडी-नाशिक महामार्गावर कुरुंद गावातील सरकारी जागेत एका प्रसिद्ध विकसकाने अतिक्रमण करून वेअरहाऊसचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे, असा आरोप संदीप काठोले यांनी केला आहे. या बांधकामास एमएमआरडीएची परवानगी नाही. तसेच इतर संबंधित परवानग्या नाहीत. या शासकीय जमीन हस्तांतरणाचा ना हरकत दाखला देण्याचा कोणताही अधिकार नाही. असे असताना विकसकाने शासनाचे आर्थिक व स्थावर मालमत्तेचे नुकसान केले आहे. हे अतिक्रमण निष्काषित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संदीप काठोले यांनी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.