Wed, Feb 1, 2023

केअरटेकरनेच चोरले एक लाखांचे दागिने
केअरटेकरनेच चोरले एक लाखांचे दागिने
Published on : 28 November 2022, 4:22 am
ठाणे, ता . २८ (वार्ताहर) ः घरातील वयस्कर व्यक्तीची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअर टेकरनेच घरातील दागिने आणि मोबाईल चोरल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील महागिरी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
महागिरी परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेने देखभाल करण्यासाठी रघुराज नावाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती. त्याने आपल्या घरातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एक लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.