काँग्रेस वाटणार लोखंडी चपला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस वाटणार लोखंडी चपला!
काँग्रेस वाटणार लोखंडी चपला!

काँग्रेस वाटणार लोखंडी चपला!

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) ः नगरपालिकेत विविध कामांसाठी नागरिक येत असतात, पण सरकारी अनास्थेमुळे त्यांच्या पदरी निराशा पडते. येण्याजाण्यात त्यांच्या चपला झिजतात. त्यामुळे काँग्रेसने नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना लोखंडी चपला देऊन प्रशासकीय कामाचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कामात सुधारणा झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला.

गेल्या अडीच वर्षांपासून नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. परिसरातील नागरिकांना विविध कामांसाठी नगरपालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. कधी अधिकारी वर्ग जागेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कामे होत नाहीत. त्यांना चपला झिजवाव्या लागतात. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नागरिकांना लोखंडी चपला देणार असल्याचे माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी सांगितले. या वेळी माजी नगरसेवक पंकज पाटील, किरण राठोड आणि सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.