संविधान दिन साजर न करणाऱ्या शाळांवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान दिन साजर न करणाऱ्या शाळांवर कारवाई करा
संविधान दिन साजर न करणाऱ्या शाळांवर कारवाई करा

संविधान दिन साजर न करणाऱ्या शाळांवर कारवाई करा

sakal_logo
By

खारघर, ता. २८ (बातमीदार) : २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. सर्व शाळा आणि महाविद्यालयांत संविधान दिन साजरा करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. असे असताना खारघरमधील काही सीबीएस बोर्डाच्या शाळांनी संविधान दिन साजरा केला नाही. या शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी प्रजासत्ताक विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यकडे केली आहे.

खारघरमध्ये ३२ मान्यताप्राप्त शाळा आहेत. विशेष म्हणजे भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. डॉ. आंबेडकर यांना एक प्रकारची श्रद्धांजली म्हणून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. शनिवारी सीबीएससी शाळेला साप्ताहिक सूट्टी असते. या संधीचा फायदा घेत खारघरमधील अनेक शाळांनी संविधान दिनाचे आयोजन केले नसल्याचे प्रजासत्ताक विद्यार्थी परिषदेचे नवी मुंबई पदाधिकारी किशोर पाटील, राजरत्न डोंगरगावकर यांनी एका पत्रकाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, संविधान दिन साजरा करण्यात यावा असे पत्र सर्व शाळांना देण्यात आले होते. ज्या शाळेने संविधान दिन साजरा केला नाही, अशा शाळांची तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे गट शिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांनी सांगितले.