पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त
पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त

पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने गोव्यात कारवाई करून पाच लाख रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या गोवा सब-झोनल युनिटने रविवारी उत्तर गोव्यात १०७ एमडीएमए गोळ्या, ४० ग्रॅम हाय-ग्रेड मेफेड्रोन आणि ५५ ग्रॅम चरस जप्त केला. अधिकाऱ्यांना एका रशियन महिलेची माहिती मिळाली होती. रशियन महिला तिचा सहकारी जे ली याच्यासोबत ड्रग रॅकेट चालवत होती. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने सिओलीममधील उदो समुद्रकिनाऱ्याजवळ सापळा रचला आणि महिलेला ५० एक्स्टसी नामक अमली पदार्थांच्या गोळ्यांसह ताब्यात घेतले.