Tue, Feb 7, 2023

गोरेगावमध्ये २० लाखांचे एमडी जप्त
गोरेगावमध्ये २० लाखांचे एमडी जप्त
Published on : 28 November 2022, 4:05 am
मुंबई, ता. २८ : गोरेगावमधील संतोषनगर येथे दिंडोशी पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ३९ वर्षीय तस्कराला रविवारी (ता. २७) सायंकाळी अटक केली आहे. त्याच्याकडे पोलिसांना २० लाख रुपयांचे अमली पदार्थ (एमडी) सापडले. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष नगर येथे एक व्यापारी अमली पदार्थांचा व्यवहार करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तस्कराला अटक केली. आरोपीने ड्रग्ज कुठून आणले होते आणि तो कोणाला पुरवणार होता याचा पोलिस तपास करत आहे.