Sat, March 25, 2023

खजूरीभट्टी परिसरात साप
खजूरीभट्टी परिसरात साप
Published on : 29 November 2022, 12:09 pm
चेंबूर, ता. २९ (बातमीदार) ः चुनाभट्टी येथील खजुरीभट्टी परिसरातील रहिवासी केतन कोरगावकर यांना त्यांच्या घराच्या पाठीमागे अचानक पाच फूट साप दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या संदर्भात त्यांनी समाजसेवक नदीम मलिक व जितेंद्र जाधव यांना माहिती दिली असता त्यांनी सर्पमित्र सिद्धार्थ गायकवाड यांना पाचारण केले. गायकवाड यांनी सापाला पकडून जंगलात सोडले. चुनाभट्टी परिसरात सतत नागरिकांना विविध जातीचे सर्प दिसत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.