नाले प्रदूषणावर केंद्राकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाले प्रदूषणावर केंद्राकडे तक्रार
नाले प्रदूषणावर केंद्राकडे तक्रार

नाले प्रदूषणावर केंद्राकडे तक्रार

sakal_logo
By

नेरूळ, ता. १ (बातमीदार)ः शहरातील नाल्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया न केलेले रासायनिक द्रव्य सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण वाढत असल्याने मनसेचे देवेंद्र खिल्लारी यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे निवेदन पाठवून तक्रार केली आहे.
नवी मुंबई शहरात छोटे-मोठे एकूण ७८ नाले आहेत. शहराच्या पूर्व बाजूला असणाऱ्या टेकड्यांमधून निर्मिती होऊन खाडीला नैसर्गिकरीत्या जोडले गेले आहेत; परंतु याच दिशेला शहरातील औद्योगिक क्षेत्रही आहे. या भागातील काही रासायनिक कारखाने हे विनाप्रक्रिया केलेले रासायनिक द्रव्य नियमित नाल्यात सोडत आहेत. तसेच झोपडपट्टी, नागरी वस्तीमधील मलनिस्सारणाच्या वाहिन्या देखील नाल्याला जोडल्या गेल्या असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या विरोधात अनेकदा बेलापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयांना निवेदन दिली गेली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी दौराही केला; परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने देवानंद खिल्लारी यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्र्यांकडे तक्रार केली. तसेच दिल्लीतील पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या शास्त्रज्ञ डॉ. प्रीती सिंग यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना याप्रकरणी कार्यवाहीची विनंती केली आहे.
---------------------