मुलुंडमध्ये आजपासून विद्यार्थ्यांसाठी ‘झेस्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये आजपासून विद्यार्थ्यांसाठी ‘झेस्ट’
मुलुंडमध्ये आजपासून विद्यार्थ्यांसाठी ‘झेस्ट’

मुलुंडमध्ये आजपासून विद्यार्थ्यांसाठी ‘झेस्ट’

sakal_logo
By

मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. यशवंतराव दोडे वर्ल्ड स्कूल विद्यालय यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘झेस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ डिसेंबर दरम्‍यान राजे संभाजी क्रीडांगणाच्या समोर होणाऱ्‍‌या कार्यक्रमाबरोबर मुलुंड आणि आसपासच्या परिसरातील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांच्या सहभागातून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात परदेशी शिक्षणाच्या संधी, विदेशी भाषा प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, ब्रेन मॅपिंग, माईंड पॉवर, नुट्रीशनल कॉउंसेलिंग, आर्ट वर्कशॉप, ब्रह्मविद्या, योगविद्या, डिझायनिंग क्षेत्रातील संधी यांसारखी दालने आहेत.
विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांची ओळख व्हावी या हेतूने मुलुंडमध्ये प्रथमच मोबाईल प्लॅनेटोरियम उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही तारांगणाचा आनंद लुटता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्याच्या हेतूने विविध कलांचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांतर्फे ३ दिवस गायन, वादन, नाट्य आणि नृत्याचे सादरीकरण होणार आहे.

मान्‍यवरांचे मार्गदर्शन
‘झेस्ट’च्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्‌घाटक न्यूक्लीयर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जयरामन हे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगावा यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. ३ डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी गुंतवणूक सल्लागार धार्मिष्ठा भाटिया शाह या गुंतवणूक लवकर का सुरू करावी, यासंबंधी माहिती देणार आहेत. तसेच सायंकाळी लेखक अमृत देशमुख हे त्यांच्या मिशन मेक इंडिया रीड या उपक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत. ४ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय चाणक्य अभ्यास मंडळाचे उपसंचालक आणि मॅनेजमेंट गुरू डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे विद्यार्थ्यांना का वाचावे, कसे वाचावे आणि काय वाचावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.