भारतीय स्त्री गौरव पुरस्कार प्रदान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय स्त्री गौरव पुरस्कार प्रदान सोहळा
भारतीय स्त्री गौरव पुरस्कार प्रदान सोहळा

भारतीय स्त्री गौरव पुरस्कार प्रदान सोहळा

sakal_logo
By

ठाणे, ता. १ (बातमीदार) : भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या गौरव समितीतर्फे सन २००२ पासून राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका व संचालिका लक्ष्मीबाई केळकर आणि द्वितीय संचालिका सरस्वतीबाई आपटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गौरव पुरस्कार दिले जातात. तसेच बकुळताई देवकुळे यांच्या स्मरणार्थ शुभेच्छा निधी दिला जातो. यंदा हा पुरस्कार व निधी पखीला बोडो व इंदुमती काटदरेसह सुमंगल चॅरिटेबल ट्रस्टला देऊन गौरवण्यात आले. बोडो, राष्ट्र सेविका समिती प्रचारिका व अखिल भारतीय शारीरिक शिक्षणप्रमुख यांना प्रमुख अतिथी अशोक चिटणीस यांच्या हस्ते लक्ष्मीबाई केळकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ३५ हजार रुपये, मानचिन्ह व शुभ्रवस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांच्या हस्ते इंदुमती काटदरे यांना सरस्वतीबाई आपटे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर मंगलम् चॅरिटेबल ट्रस्टला बकुळताई देवकुळे पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, परिचय, आभार वंदना विद्वांस यांनी मानले. या वेळी सोहळ्याला लेखक अशोक चिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.