गोवंडी सिटिझन्स संस्थेच्‍या पाठपुराव्‍याला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडी सिटिझन्स संस्थेच्‍या पाठपुराव्‍याला यश
गोवंडी सिटिझन्स संस्थेच्‍या पाठपुराव्‍याला यश

गोवंडी सिटिझन्स संस्थेच्‍या पाठपुराव्‍याला यश

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) : गोवंडी रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला लवकरच नवीन तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी गोवंडी सिटिझन्स या संस्थेने मध्य रेल्वेकडे केली होती. त्याला उत्तर देताना पादचारी पुलावरील तिकीट खिडकी सुरू आहे, तसेच फलाट क्रमांक १ अ वरील नवीन खिडकी लवकरच सुरू होईल असे रेल्वेकडून सांगण्यात आले. गोवंडी पश्चिमेकडे शिवाजी नगर, बैंगनवाडी, लुम्बिनी बाग या दाट लोकवस्तीच्या परिसरासह देवनार मनपा वसाहत, लल्लूभाई वसाहत तसेच टाटा नगर हा परिसर आहे. या सर्व परिसरातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने मुंबई तसेच नवी मुंबई, पनवेलच्या दिशेला प्रवास करतात. त्या प्रवाशांसाठी पश्चिमेकडे तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गोवंडी सिटिझन्स या संस्थेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीला उत्तर देताना पादचारी पुलावर एक खिडकी सुरू आहे. फलाट क्रमांक १ अवर नुकतीच आणखी एक खिडकी बांधण्यात आली असून लवकरच सुरू होईल, अशी रेल्वे माहिती प्रशासनाने दिली.