तारापूरमधील बेकायदा झोपड्या जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारापूरमधील बेकायदा झोपड्या जमीनदोस्त
तारापूरमधील बेकायदा झोपड्या जमीनदोस्त

तारापूरमधील बेकायदा झोपड्या जमीनदोस्त

sakal_logo
By

मनोर, ता. १ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भूखंडावर बेकायदा उभारलेल्या झोपड्या एमआयडीसीच्या बांधकाम विभागाकडून उध्वस्त करण्यात आल्या. बुधवारी जेसीबी मशीनच्या साह्याने सत्तरपेक्षा अधिकच्या संख्येने झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीमधील भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जोर लावण्यात आला आहे. तारापूर एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुकेश लांजेवार यांनी कारवाईचा धडाका लावला आहे.
एमआयडीसीतील जिंदाल स्टील वर्क कंपनीसमोरील ओएस ४९ या एमआयडीसीच्या मोकळ्या प्लॉटवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातील इमारत बांधकामावर कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी गेल्या काही वर्षांपासून झोपड्या बांधल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण करून गिळंकृत केलेले एमआयडीसीचे भूखंड मोकळे करण्याची मागणी उद्योजकांकडून होत होती. त्या अनुषंगाने तीन महिन्यांपूर्वीच सहायक अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लांजेवार यांनी तोडक कारवाईला जोरदार सुरुवात केली आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असून त्याकरिता एक जेसीबी तयार ठेवण्यात येणार आहे. अतिक्रमण केलेल्या व निष्कासित केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण किंवा झोपड्या केल्याचे आढळले, की लगेचच त्यावर कारवाई करण्यात येईल आणि भूखंड मोकळे ठेवण्यात येतील. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईसाठी २ जेसीबी, १५ कामगारांनी ही कारवाई पार पाडली.