मालाड मधील १८ तलावांची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाड मधील १८ तलावांची स्वच्छता
मालाड मधील १८ तलावांची स्वच्छता

मालाड मधील १८ तलावांची स्वच्छता

sakal_logo
By

मालाड, ता. १ (बातमीदार) ः पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार ‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई’ हा उपक्रम दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पी/उत्तर विभागात राठोडी येथील ‘कमळ तलाव’ या ठिकाणी गुरुवारी (ता. १) सकाळी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार असलम शेख तसेच पालिका पी उत्तर विभागीय सहायक आयुक्त किरण दिघावकर व माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता कार्यक्रमाकरिता तराफे, जेसीबी व क्रेन या यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. पी/उत्तर विभागातील हिरादेवी व शांताराम तलावांचीदेखील साफसफाई करण्यात येत आहे.
या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी, पालिका कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक संस्था यांचा सहभाग होता. उपस्थितांना खासदार व आमदार यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता मुंबई पब्लिक स्कूल मालवणी टाऊनशिप व मालवणी व्हिलेज या शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. तसेच मायग्रेन सोसायटी, वंदे मातरम शिक्षण संस्था व विविध स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदवला.

१८ तलावांचीही स्‍वच्‍छता
पी/उत्तर विभागात अस्तित्त्वात असलेल्या १८ तलावांचीही स्‍वच्‍छता करण्यात येणार आहे. यापैकी ११ तलाव राज्य शासन, दोन तलाव म्‍हाडा, दोन तलाव जिल्हाधिकारी व तीन तलाव महापालिका यांच्या अखत्यारीत येतात.