कांदिवलीत गीता जयंती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत गीता जयंती उत्सव
कांदिवलीत गीता जयंती उत्सव

कांदिवलीत गीता जयंती उत्सव

sakal_logo
By

कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम पोयसर जिमखाना येथे ३ डिसेंबर रोजी गीता जयंती उत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखान्‍यात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वामी कृष्ण भजनदास आणि पुष्टी मार्गाचे भुलेश्वर, मोटा मंदिरचे १०८ गोस्वामी राजकुमार महाराज उपस्थित राहणार आहेत. खासदार गोपाळ शेट्टी यांनी ११ जूनपासून सामाजिक संस्थांच्या मदतीने उत्तर मुंबईतील विविध ठिकाणी गीता अभ्यास कार्यक्रम सुरू केला आहे. भगवद्‍गीता शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी सांगितले, की इस्कॉन संस्थेच्या श्री कृष्ण भजन दास यांच्यातर्फे गेल्या सहा महिन्यांपासून उत्तर मुंबईत गीतेचा अभ्यासक्रम सुरळीत सुरू असून १८ अध्यायांचा सराव पूर्ण झाला आहे. दरम्‍यान, पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी आणि भगवद्‍गीता शिक्षा अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी सर्व नागरिकांना गीता जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.