प्लास्टिक जनजागृतीसाठी पोलिस अधिकारी सरसावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक जनजागृतीसाठी पोलिस अधिकारी सरसावले
प्लास्टिक जनजागृतीसाठी पोलिस अधिकारी सरसावले

प्लास्टिक जनजागृतीसाठी पोलिस अधिकारी सरसावले

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : केशव सृष्टी ग्रामविकास योजनेंतर्गत विक्रमगड आठवडी बाजारामध्ये प्लास्टिक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप गीते व पोलिस उपनिरीक्षक सतीश जगताप उपस्थित होते. कार्यक्रम विक्रमगड हायस्कूल येथील विद्यार्थी आणि केशव सृष्टी ग्रामविकास योजना संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत हा कार्यक्रम विक्रमगड आठवडी बाजारामध्ये राबवण्यात आला.
या उपक्रमामध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना कचऱ्यापासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी माहिती देण्यात आली. कचरा कसा संकलित करायचा आणि त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची याची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक गीते यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वापराविषयी व प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमास केशव सृष्टी ग्रामविकास योजनेचे कार्यकर्ते केंद्रप्रमुख दिलीप घाटाळ, विस्तारक योगेश खांजोडे, सूरज डिग्रसे, हरपुडे सर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.