कटक बाली यात्रेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कटक बाली यात्रेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
कटक बाली यात्रेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

कटक बाली यात्रेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

sakal_logo
By

कटक, ता. १ (वृत्तसंस्था) : ओडिसा राज्यातील कटक महापालिकेने ‘ओरिगामी शिल्पे फोल्डिंग-सिंगल वेन्यू’चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. ओडिशाचा पौराणिक सागरी इतिहास साजरे करणाऱ्‍या कटक बाली यात्रा महोत्सव-२०२२ मध्ये बोईटासवर (बोटी) प्रवास करणाऱ्या सदाबांनी (प्राचीन ओडिया नाविकांनी) साधलेल्या दुर्मिळ पराक्रमांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम पालिकेतर्फे राबवला जातो. कटक येथील बाराबती क्रिकेट स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला. विविध शाळा, नागरी समाज आणि सीएमसी अधिकारी अशा एकूण २१२१ जणांनी ३५ मिनिटांत तब्बल २२,४७३ ओरिगामी कागदी बोटी फोल्ड करून हा विक्रम नोंदवला. प्रत्येक सहभागीने दिलेल्या वेळेत सरासरी ११ ओरिगामी कागदी बोटी बनवल्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अॅडज्युडिकेटरने विक्रमाचे प्रमाणपत्र कटकचे महापौर सुभाष चंद्र सिंह यांना प्रदान केले.