दहिसर काशीमठाचा दशक ब्रह्म रथमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिसर काशीमठाचा दशक ब्रह्म रथमहोत्सव
दहिसर काशीमठाचा दशक ब्रह्म रथमहोत्सव

दहिसर काशीमठाचा दशक ब्रह्म रथमहोत्सव

sakal_logo
By

कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः दहिसर पूर्व येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात काशीमठाचा दशक ब्रह्मरथ महोत्सव दिमाखात संपन्न झाला. एक मजल्याच्या उंचीचा भव्य दिव्य साग-चंदन लाकडाचा ब्रम्हरथ विठ्ठल-रखुमाई मंदिरातून शेकडो भाविकांनी जयघोषात ओढत शक्तीनगर श्री काशीमठ विठ्ठल-रखुमाई मंदिर चौकातून पुन्हा मंदिरात आणला. या वेळी ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
श्री काशीमठ संस्थान वाराणशी अंतर्गत दहिसर पूर्व सुधिंद्र नगर जवळच श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात पंढरपूर तीर्थस्थान येथून स्वामीजींना श्री विठ्ठल-रखुमाई चांदीच्या दिव्य मूर्ती भेटीदाखल दहा वर्षांपूर्वी प्राप्त झाली. या मूर्तीची श्री काशीमठ विठ्ठल-रखुमाई मंदिरात स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गेली दहा वर्षे ब्रम्हरथ महोत्सव हजाराहून अधिक जनसमुदायासमोर नेत्रदीपक रथयात्रा काढण्यात येते. आठवडाभर गौड सारस्वत ब्राह्मण जी. एस. बी. समाजातील तीर्थरूप स्वामीजी राष्ट्रीय तसेच राज्यातील जिल्ह्यांतर्गत काशीमठ संस्थान जनसमुदाय ही देवदिवाळी साजरी करतात. या वर्षी २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शास्त्रोक्त धार्मिक विधी, प्रार्थना पंचामृत महापूजा, अभिषेक, महाआरती, भजन, विठ्ठलाचा जयघोष करण्यात आला. शेवटच्या दिवशी कढण्यात आलेल्या विशाल ब्रह्मरथ यात्रेत भाविक एकरूप होऊन तल्लीन झाले. या वेळी नगररचनाकार, माजी आमदार चंद्रशेखर प्रभू, नरेंद्र मेहता, विनोद घोसाळकर आदी मान्‍यवरांनी श्री काशीमठ विठ्ठल-रखुमाई मंगलमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिराचे अध्यक्ष मोहनदास मल्या, सचिव वरद मल्या, खजिनदार उमेश कामत व दहाव्या दशक ब्रह्मरथ महोत्सव कमिटीचे अध्यक्ष जी दामोदर यांनी सर्वांचे स्वागत केले.