स्थलांतरित बालकांकडून गोवर पसरण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थलांतरित बालकांकडून गोवर पसरण्याची भीती
स्थलांतरित बालकांकडून गोवर पसरण्याची भीती

स्थलांतरित बालकांकडून गोवर पसरण्याची भीती

sakal_logo
By

पालघर, ता. १ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यानंतर एकही गोवर आजाराने ग्रस्त बालक आढळलेले नाही. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, मात्र लसीकरण न झालेल्या स्थलांतरित बालकांकडून हा आजार जिल्ह्यात पसरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे स्थलांतरित मजुरांच्या वसाहतीकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या जानेवारी महिन्यापासून पालघर जिल्ह्यात ६० बालकांना गोवरची लक्षणे आढळून आली होती. त्या सर्वांची तपासणी केली असता मार्च, एप्रिल व जुलै महिन्यात प्रत्येकी एका बालकावर गोवर आल्याचे आढळून आले होते. सध्या जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असून पंधरा वर्षांखालील कोणत्याही बालकांना ताप अंगावर पुरळ आल्यास त्यांना या आजाराचे संशयित रुग्ण असे गृहीत धरून त्यांची तपासणी केली जात आहे.
गेल्या नऊ महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना दर सहा महिन्याला जीवनसत्व ‘अ’ची प्रतिबंधात्मक मात्रा दिली जात आहे, पण रोजगाराच्या शोधात राज्यातील विविध भागांतून, तसेच इतर राज्यांतून होणाऱ्या स्थलांतरित कुटुंबांतील बालकांचे गोवर लसीकरण झाले नसल्यास त्यांच्यामार्फत गोवरचा प्रसार होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या दृष्टीने जिल्हा आरोग्य प्रशासनाने अशा स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांच्या वसाहतींवर लक्ष केंद्रीत केले असून त्या ठिकाणी नियमितपणे तपासणी व देखरेख यंत्रणा कार्यरत केली आहे.
....
सर्वेक्षण मोहीम हाती
जिल्ह्यात पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून लसीकरण उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध जिल्हा प्रशासन अग्रक्रमाने घेत असून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासन कार्यरत असल्याची जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.