प्रिमिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रिमिअर
प्रिमिअर

प्रिमिअर

sakal_logo
By

देवदत्त नागेची ‘जीव माझा गुंतला’मध्ये एन्ट्री

कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत अंतरा-मल्हार आजवर अनेक आव्हानांना सामोरे गेले. अनेक कसोटी त्यांनी एकत्र मिळून पार केल्या. काही अडचणींमध्ये तिला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून अंतरा आणि मल्हारवरील संकंटे कमी होण्याचे नाव घेत नाही. आतादेखील मल्हारच्या हाताला दुखापत झाल्याने त्याची सर्जरी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी तिला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्जरी कशी निर्विघ्नपणे पार होईल हे अंतराच्या समोरचं सगळ्यात मोठ्ठं आव्हान आहे. आणि तेच आव्हान पूर्ण करण्यासाठी अंतराने रेसमध्ये सहभागी होण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच रेसमध्ये आयोजक म्हणून मालिकेत नवी एंट्री होणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता देवदत्त नागे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत तुषार देसाई हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणार आहे. आता हे पात्र निगेटिव्ह असेल कि, मल्हार-अंतराला या कठीण परिस्थितून मदत करेल हे हळूहळू उलघडेल. मालिकेत लवकरच रेस सुरू होणार आहे आणि अंतरादेखील त्यामध्ये सहभागी होणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, ‘‘मी जेव्हा ही मालिका बघितली तेव्हा माझा जीव त्याच्यामध्ये गुंतला असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा मला या भूमिकेविषयी विचारणा झाली मी लगेच होकार दिला. ही भूमिका स्वीकारण्यामागे अजून एक उद्देश होता कि, एक चांगली मालिका जिने ५०० भागांचा टप्पा लवकरच गाठणार आहे त्या मालिकेचा आपण एक भाग बनणं एक खरंच खूप महत्वाचं आहे. कितीही काही म्हंटलं तरी मी कितीही, हिंदी मराठी चित्रपट केले तरीसुद्धा मला टेलिव्हिजनने खूप काही दिलं आहे आणि टेलिव्हिजनवर असं कॅरॅक्टर करणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे.’’