शिवाजी पार्क परिसराची रात्रीतून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पार्क परिसराची रात्रीतून स्वच्छता
शिवाजी पार्क परिसराची रात्रीतून स्वच्छता

शिवाजी पार्क परिसराची रात्रीतून स्वच्छता

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते; परंतु सकाळच्या सुमारास मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या झाडलोटीने नागरिकांना धुळीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता महापालिकेकडून शिवाजी पार्क परिसराची रात्रीच्या वेळीच स्वच्छता करण्यात येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेली ही सूचना महापालिकेने मान्य केली.
महापालिकेकडून सकाळच्या सुमारास शिवाजी पार्क परिसराची स्वच्छता केली जाते. त्यावेळी उडणाऱ्या धुळीमुळे मॉर्निंग वॉकवेळी नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार कानावर आल्याचे मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. धुळीमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने शिवाजी पार्क परिसराची स्वच्छता रात्रीच्या वेळी करणे शक्य आहे का, अशी विचारणा त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी आठवडाभरात शिवाजी पार्क परिसरातील स्वच्छता रात्रीच्या वेळी करण्यास सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी लागणारी व्यवस्था पालिकेकडून करण्यात येईल, असे स्पष्ट केले.