Mon, Jan 30, 2023

न्यायालयातून मोबाईल चोरणारा अटकेत
न्यायालयातून मोबाईल चोरणारा अटकेत
Published on : 1 December 2022, 1:07 am
मुंबई, ता. १ : अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांचे सहा मोबाईल पळवणाऱ्या चोरट्याला अंधेरी पोलिसांनी बुधवारी (ता. ३०) रात्री अटक केली. शोएब शेख असे चोरट्याचे नाव असून त्याला न्यायालयातर्फे पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शोएब हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. शुक्रवारी (ता. २५) ही चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर एक तपास पथक तयार केले. न्यायालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून आरोपीची ओळख पोलिसांनी निश्चित केली. खबऱ्यांच्या माहितीनुसार सापळा रचून अंधेरी पश्चिमेतून त्याला ताब्यात घेण्यात आले. शोएबने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शोएबला अंधेरी पोलिसांनी २०१८ मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. यात तो जामिनावर बाहेर होता.