Tue, Jan 31, 2023

संजय पाटील यांचे निधन
संजय पाटील यांचे निधन
Published on : 1 December 2022, 2:12 am
ठाणे, ता. १ ः जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पाटील यांचे नुकतेच (ता. २९) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. जनकवी व ठाणे महापालिकेचे दिवंगत नगराध्यक्ष पी. सावळाराम यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले पाटील खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात भगिनी डॉ. कल्पना पाठारे, पत्नी गीता, मुलगा ओंकार, मुलगी संपदा, सून सुवर्णा आणि नात असा परिवार आहे.