श्वानाला ‘कुत्रा’ म्हटले म्हणून रिक्षाचालकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वानाला ‘कुत्रा’ म्हटले 
म्हणून रिक्षाचालकाला मारहाण
श्वानाला ‘कुत्रा’ म्हटले म्हणून रिक्षाचालकाला मारहाण

श्वानाला ‘कुत्रा’ म्हटले म्हणून रिक्षाचालकाला मारहाण

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : आपल्या पाळीव श्वानाला ‘कुत्रा’ असे संबोधल्याने संतप्त झालेल्या २५ वर्षीय तरुणाने ६० वर्षीय रिक्षाचालकाला मारहाण केली. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपी राहुल भोसले याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. २९) रिक्षाचालक शिवसागर शर्मा रात्री १०.३० च्या सुमारास भांडुपच्या म्हाडा कॉलनीत आले होते. आरोपीने त्यांच्या श्वानाबद्दल रिक्षाचालकाला विचारले असता त्यांनी ‘कुत्रा’ पाहिला नसल्याचे सांगितले. ‘कुत्रा’ शब्द ऐकताच आरोपी संतापला आणि रिक्षाला लाथा मारण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. शिवीगाळ केल्यानंतर आरोपीने पीडिताची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्मा यांनी केला. यामध्ये शर्मा यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी आरोपी राहुल भोसले याला अटक केली.