Tue, Jan 31, 2023

भिवंडी पालिकेतील २५४ पदांना मंजुरी
भिवंडी पालिकेतील २५४ पदांना मंजुरी
Published on : 1 December 2022, 3:54 am
भिवंडी, ता. १ (बातमीदार) : मागील कित्येक वर्षे आकृतिबंध मंजूर नसल्याने भिवंडी महापालिकेतील कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली होती. तब्बल २१ वर्षांनी राज्य शासनाने आकृतिबंध मंजूर करीत पालिका आस्थापनावरील विविध २५४ पदांच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला असून लवकरच या पदांची भरती महापालिकेत होणार आहे. नगर विकास मंत्रालयाने बुधवारी (ता. ३०) त्यासंदर्भातील अध्यादेश जारी केला असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी पत्रकारांना दिली. या भरतीमुळे पालिका आस्थापनांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार असल्याने कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. या भरतीसंदर्भात आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.