हद्दपारीचे आदेश मोडणाऱ्या दोन आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दपारीचे आदेश मोडणाऱ्या दोन आरोपींना अटक
हद्दपारीचे आदेश मोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

हद्दपारीचे आदेश मोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

sakal_logo
By

ठाणे, ता. २ (वार्ताहर) : हद्दपारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोघा आरोपींना श्रीनगर आणि चितळसर पोलिसांनी अटक करण्याची कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांनी लक्ष्मण शाम देवरस (वय ३८, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांतून ३० जुलै २०२२ रोजी सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते; मात्र १ डिसेंबर रोजी तो वागळे इस्टेट परिसरातील संतोषी माता चाळ येथे खंडणीविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून पथकाने श्रीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी तिरुपती ऊर्फ अथर्व जीवनराव मुंडकर (वय २४, रा. भवानी नगर, ठाणे (प.)) याला १४ एप्रिल २०२२ रोजी ठाणे पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले. तो सुभाषनगर येथे खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला. या दोन्ही आरोपींविरोधात सरकारच्यावतीने गुन्हा दाखल करून अटक केल्याची कारवाई केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.