अंनिसच्या वतीने माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंनिसच्या वतीने माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे व्याख्यान
अंनिसच्या वतीने माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे व्याख्यान

अंनिसच्या वतीने माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे व्याख्यान

sakal_logo
By

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सोमवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयीचे विचार’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज पाटील असतील. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन न्यायमूर्ती गोखले यांच्या हस्ते होईल. हे व्याख्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह पाहता येईल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंनिसच्या वतीने राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण आणि राहुल थोरात यांनी केले आहे.